Kalat Nakalat Title Song - Vaishali Samant Lyrics
Singer | Vaishali Samant |
Music | Nilesh Moharir |
Song Writer | Ashwini Shende |
Kalat Nakalat Lyrics in Marathi
मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती
मन वार्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते-
सारे कळत नकळतच घडते
कुणीतरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले
पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते
वाहत-वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हापुन्हा मोहरते
सारे कळत नकळतच घडते
0 Comments