Jai Jai Swami Samarth - Ashta Lohar Lyrics
Singer | Ashta Lohar |
Music | Shashank Pawar |
Song Writer | Vaibhav Joshi |
Jai Jai Swami Samarth Lyrics in Marathi
स्वामी जगाची माऊली
स्वामी कृपेची सावली
अशी निरंतर माया
आम्ही कुठे न पहिली
आनंदाचे दान देई
संकटात धाव घेई
सारी सुमने श्वासांची
स्वामी चरणी वाहिली
तारण हार सगुण साकार सदा हाकेसी धाऊन येई
अपरंपार असा आधार तयाच्या पार मनाला नेई
ध्वजा स्वामींची मिरवतो आम्ही
म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
0 Comments